प्रेम..
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
पण तुझ आणि माझ कधीच सेम नसतं..
माझ्या अश्रुंच नात तुझ्या अश्रुंशी कधीच नसतं,
माझ्या नसण्याचं तुझ्या असण्याला समाधान असतं..
मिच फ़क्त भावनांनी वाहवत जायचं,
मिच फ़क्त अतृप्त आत लढायचं..
मी पाण्यातही तुझे अश्रु शोधले,
माझ्या अश्रूंनाही तु पानी समजले..
माझाच संघर्ष का नेहमी नियतीशी,
का ग खेळतेस माझ्या जाणिवेशी..
माझ्या स्वप्नांचा तुझ्याशी करार,
एकदाच दे ना तु होकार..
धुंद जाणिवांना व्यक्त करण्या,
आज मला होकार दे..
कळायला हवे तुला ते सांगण्या,
डोळ्यांचा तुझ्या स्विकार दे..
तु दिसता मी जग विसरतो,
तुच आता आधार दे..
1 comment:
satish mala tuzi love poem manapasun aavadli. b'coz tuzya poem cha jo meaning ahe tech mazya manatil dukhhha ahe. nice poen i like it. me apeksha karto ki tu amchya sati ashach navin poem tayar karshil, best luck for your future life.
Post a Comment