Friday, July 5, 2013

माझी मैत्रीण..


नजरा नजर होताच,
हरवायचो नेहमी..
गप्पांना दोनच शब्द,
तू आणि मी..

आपल्या जखमांचा,
रस्ता एकच..
दिसतात वेगळ्या,
पण भावना एकच..

मनाचे धागे,
जोडलेत असे..
एक दुसऱ्याच्या,
वर्तनाचे आरसे..

मनातून जात नाही,
आयुष्यात आता नाही..
बोलायला मी आहे,
ऐकायला तू नाही..

Sunday, May 12, 2013

निष्पर्ण..


अस्तित्वाला रंग देवून,
उडून गेलेत क्षण सारे..
हि अदृश्य नाती,
अजुनी रक्तात फिरे..

पुन्हा हवे आहे काही,
परत शक्य नाही..
आधीच निसटले हातून,
किती जरी वळून पाही..

कळी तुझी कोमेल्यावर,
आठवशील का मला..
ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये,
जागा देशील का मला..

कोणता अपराध झाला,
निष्पर्ण वृक्ष नशिबी सारा..
आकाशातल्या धुक्यात,
कुढत बसतो वारा..

Monday, December 10, 2012

ATKT चा राग..


ATKT चा राग..

सांग सांग देवा रे,
फेसबुक वर येशील का..
तुझ्या POST ला COMMENTS साऱ्या देतो,
जरा भाव मला देशील का..!!..

LECTURE ला PROXY मारून,
ATTENDANCE वाढवशिल का..
ATKT सोडवून,
PLACEMENT देशील का..!!.

मार्कानवाली पोरं फार भाव खातात,
त्यांनाही थोडस TENSION देशील का..!!..
DAA ची बया त्रास खुप देते,
तिलाही सर्दी-खोकला जरा आणशील का..!!..

सध्या CALL तुला लागत नाहीये,
हृदयाच्या MOBILE ला RANGE देशील का..
म्हणुनच, सांग सांग देवा रे,
फेसबुक वर येशील का..!!..

इतक सारं तु देतोय म्हटल्यावर ,
PHOTO तुझा UPLOAD करतो..
तिनेही LIKE करावं,
मनात तीच्या आणशील का..!!..

सतीश..!!..

Wednesday, June 2, 2010

अणि मी, असच जगतो ..

अणि मी, असच जगतो ..


सारेच इथे असताना माझच जग खिडकीबाहेर ,
क्षितिजा पलिकडच एकटेपण सगलेच विसरतात संध्या अखेर ..

काहींच अस्तित्व कदाचित सापडत नसत ,
उद्याच्या दिवशी " आज " ला संपून जातं ..

माझ्या वाटांची वळण अगदी वेडी करून जातात ,
आप्तांच्याच ठेचा पुन्हा पुन्हा लागतात ..

कोणजाने काय होत वेळीच शब्द निसटुन जातात ,
कधी कधी पंखांचच बळ जिव नकोस करुन जातात ..

बाहेर कितीही हो असताना आतून मन नाकारत ,
मन मोकळ कारावस वाटल उभ आयुष्य आकरत ..

उगाचच लिहितो, अणि मी, असच जगतो ..
अणि मी, असच जगतो ..

Thursday, March 18, 2010

प्रेम..

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
पण तुझ आणि माझ कधीच सेम नसतं..
माझ्या अश्रुंच नात तुझ्या अश्रुंशी कधीच नसतं,
माझ्या नसण्याचं तुझ्या असण्याला समाधान असतं..
मिच फ़क्त भावनांनी वाहवत जायचं,
मिच फ़क्त अतृप्त आत लढायचं..
मी पाण्यातही तुझे अश्रु शोधले,
माझ्या अश्रूंनाही तु पानी समजले..
माझाच संघर्ष का नेहमी नियतीशी,
का ग खेळतेस माझ्या जाणिवेशी..
माझ्या स्वप्नांचा तुझ्याशी करार,
एकदाच दे ना तु होकार..
धुंद जाणिवांना व्यक्त करण्या,
आज मला होकार दे..
कळायला हवे तुला ते सांगण्या,
डोळ्यांचा तुझ्या स्विकार दे..
तु दिसता मी जग विसरतो,
तुच आता आधार दे..

Wednesday, March 17, 2010

चुक झाली..


मी नेहमी स्थिरच होतो,
तुझ्या शब्दांना मात्र पडझड झाली..
ठरवले बोलून टाकावे आता,
नेहमी तेव्हाच तुझी "बाय" ची हाक आली..
सगळ्याना ठावुक आहे,
माझ्या मनातली गोष्ट तुलाच ना कळली..
मरता येत नाही म्हणून जगतो मी,
तुझ्या डोळ्यातल्या आशेची हमी वाटली..
इथे रोज गुदमरते आता,
वाटते, तुही माझी ना उरली..
तुला हवे ते मिळो,
नकोच माझी सावली..
दूर होता आयुष्यातून तुझ्या,
तुला कळणार मी..
तुझीच वाट बघेन नेहमी,
पण ना वळणार मी..
तुला माझे समजलो,
चुक झाली, चुक झाली..

Saturday, October 17, 2009

कोणजाणे मला गर्दी,
का आवडत नाही..
ह्रदय भरलय फारच,
आता दु:ख आत शिरणे नाही..
माझ आकाश, माझी स्वप्ने,
मलाच फसवतात माझे आत्मे..
एकटा मी मलाच हवाहवासा,
माझ्या प्राक्तनात कारुण्याचा थवा..
तुझ्या अंतरी मी ना कुणी,
धगांमध्ये असत माझ्याच डोळ्यातलं पाणी..
कोणजाणे मी कसा वागतो,
कोणजाणे हा गला नेहमी का दाटतो..