Friday, July 5, 2013

माझी मैत्रीण..


नजरा नजर होताच,
हरवायचो नेहमी..
गप्पांना दोनच शब्द,
तू आणि मी..

आपल्या जखमांचा,
रस्ता एकच..
दिसतात वेगळ्या,
पण भावना एकच..

मनाचे धागे,
जोडलेत असे..
एक दुसऱ्याच्या,
वर्तनाचे आरसे..

मनातून जात नाही,
आयुष्यात आता नाही..
बोलायला मी आहे,
ऐकायला तू नाही..