Friday, July 10, 2009
कधीतरी आपण दुरावणार..
दूर जावून स्थिरवणार ,
हा विरह खुप दू:ख देणार ..
कधीतरी आपण ,
नकळत एकमेकाना विसरणार,
विसरून पुढे नवे जोडणार,
जुने आठवल्यावर निष्फल शोध घेणार ..
कधीतरी आपल,
आयुष्य इतकी वलन घेतं ,
वलता वलता कळत नाही ,
आयुष्य कुठे वलत..
कधीतरी ,
आज मला कलल ,
जे काल कलल नव्हत ,
अभ्यास करण्यासाठी माज मन वलल नव्हत ..
तू नेहमीच का अस करतेस..
कधी G-mail तर कधी Orkut मधून दूर दूर जातेस..
जाण नाही तुला आहेस तू किती वेगळी,
आकाशातल्या तारयांनाही तुझीच ओढ़ सगळी..
का हावी ग जीवनात दिशा,
असुदे चेहर्यावर हसण्याची नशा,
डोळ्यांतुन वाहुदे जीवनातली आशा,
हातात फ़क्त असावी जिंकण्याची भाषा..
भातुकलीच्या खेलासारख रुसावं,
रडत असली तरी थोड हसावं,
गवतातल्या दवासारख मन शाहारावं,
विनाशाच्या स्वप्नांना तू नेहमीच का बघावं..
पटणार नसेल तरी ऐक ग,
तेढ एक हृदयाची सुटली ना,
लहान मी, सांग माझे कुठे काही चुकले का..?..
वर्ष..
कळलच नाही..
कधी छललं,कधी सांभाललं,
कळलच नाही..
मोठ्या त्यागातुन छोट्या स्वप्नांना साकारलं,
पण मनाला पटलच नाही..
ठरलेल्या आणाभाकांच गूढ़,
पुन्हा एकदा कळलच नाही..
ह्रुदयात प्रेम गोंजारताना,
दू:खांना कुरवाळलच नाही..
का सोडून गेलास मला..
स्
का सोडून गेलास मला,
अलविदा करायला मी होतो तुला,
पण मी जग सोडेन,
तेव्हा निदान कलेल तरी का तुला,
स्वार्थी तू..
मला आठवतय रे,
तुझी लिबेरो मी माझी समजायचो,
मी गाड़ी उडावताना तू मला बिलगून बसणं,
गाड़ी हलू चालव म्हणुन खुप झापन्,
आणि आज तुलाच रे गाडीने दगा दिला,
का तू असा मलाच जग नकोसा करून गेला,
स्वार्थी तू..
सांगायचच राहिलं रे,
आता तुझी जागा कुणीच भरणार नाही,
घराकडून जाताना तुझ्या मला तू दिसणार नाही,
स्वार्थी तू..
न पुर्ण होणारी एकच इच्छा राहिली माझी,
एकदा तरी तुझ्याशी मन भरून बोलायचे रे,
तू शोधलेला जगण्याचा अर्थ मलाही हवा होता रे,
स्वार्थी तू..
रात्री रात्री सोबत हिंडन,
तू आता रडवेल मला,
कसा विसरु मी तुझा फोन नंबर,
" तू म्हणशील ते करेल " म्हननारा तुझा आवाज,
स्वार्थी तू..
का रे त्या रात्री मी नव्हतो तुजसोबत,
आजही आपण वरून बघितलं असत सर्वांना,
बघतोयेस न रे मला एकट्याला,
अर्थ काय आता या आयुष्याला,
तुला केलेला "कढी" चा आग्रह महिन्याआधीच्या पंगतीतला,
आता कुणाला देवू मी असा त्रास,
स्वार्थी तू..
स्वप्नांमध्ये ये रे माझ्या,
रागवायचे आहे तुला,
रोज मी चन्द्र बघतो,
आता तारा पण बघेल तू आहे समजुन,
केवढा आधार होता तू मला,
स्वार्थी तू..
ये न परत,
म्हन "सतीश गम्मत केली रे तुझी",
"तुला कसा सोडून जाइल मी ",
अरे कुणाला सांगू कॉलेज मधल्या गमती,
कोण सोडवेल घरी लागणारा माझा कर्फ्यु,
स्वार्थी तू..
आता एकच ह्या अन्यायी देवाशी मागने,
असेल तिथे तू सुखी रहा,
आणि तुझी खुशाली स्वप्नांत माझ्या कलवत जा,
नाही रे स्वार्थी नाही तू..
तुझ्या नावाला..
तुझ्या मनाला जाणण्या मी गर्क आहे,
ह्रुदयात माझ्या तुझा अर्क आहे,
तू नसता जगने मला नर्क आहे,
फितूर असणारयांशी आम्ही प्रेम करुन बसलो,
मरत्या क्षणाणा व्यक्त करुन बसलो,
आयुष्यातले अनुभव खुप काही शिकवून जातात,
मार्गात फ़क्त ज्याच्या काटेच येतात..
मी सतीश मनोहर नरोडे..
ओळख अजूनतरी निर्माण नाहीये..
मी फ़क्त सतीश मनोहर नरोडे..
डिप्लोमा ला असुनही मला कविता करायला आवडतात..(कदाचित हा मुर्खपना असेल ).
मला अवांतर वाचन करायला आवडते..
प्रोग्रामिंग पेक्षा मला चन्द्र जास्त भावतो..(मी खरच मुर्ख आहे )..
प्रत्येक गोष्ट मला करण्याआधी अशक्य वाटते..
केल्यानंतर बिनकामी वाटते..
मी कधी मला दोष देत नाही कारण तो देण्यासाठी इतर सर्व हजर असतात..