चुक झाली..
मी नेहमी स्थिरच होतो,
तुझ्या शब्दांना मात्र पडझड झाली..
ठरवले बोलून टाकावे आता,
नेहमी तेव्हाच तुझी "बाय" ची हाक आली..
सगळ्याना ठावुक आहे,
माझ्या मनातली गोष्ट तुलाच ना कळली..
मरता येत नाही म्हणून जगतो मी,
तुझ्या डोळ्यातल्या आशेची हमी वाटली..
इथे रोज गुदमरते आता,
वाटते, तुही माझी ना उरली..
तुला हवे ते मिळो,
नकोच माझी सावली..
दूर होता आयुष्यातून तुझ्या,
तुला कळणार मी..
तुझीच वाट बघेन नेहमी,
पण ना वळणार मी..
तुला माझे समजलो,
चुक झाली, चुक झाली..
No comments:
Post a Comment