तुला बघितले ..
तुला बघितले ..तुला बघितले,आणि मी शब्दांपलिकडे गेलो..रोजचे शब्द उच्चारन्या,ह्या मानाने नाकारले..डोळ्यांनीच माझ्या, तुझ्या डोळ्यांना,ठीक आहे का विचारले..तू कशी मी कसा,अलगद पापन्यांना समजले..दिसता तुझ्या ओठांवर हसू,आत्म्याचे या पारणे फिटले..हा गारवा तुझ्यापुढे फिका,तुझ्यामुले हे मन शहारले..अस्तित्व विलीन करण्या मी सज्ज,मी तुला कधीच स्वीकारले..जगा वाटे मी वेडावलो,पण , पण मी तर ..शब्दांपलिकडे गेलो..